Home राजकीय दौंड येथील सावंत नगर येथे भव्य पथदिवे लोकार्पण सोहळा संपन्न

दौंड येथील सावंत नगर येथे भव्य पथदिवे लोकार्पण सोहळा संपन्न

by krushna
0 comments

दौंड : पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 1 कोटी ५५ लाख रुपये निधीतून ४०० पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यानिमित्त आयोजित भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

मा. श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. श्री. विरधवल जगदाळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. कार्यक्रमात गोपाळवाडी रोड, अमर गणेश सोसायटी, भवानी नगर, समता नगर, सावंत नगर आणि पंचगंगा सोसायटी परिसरातील पथदिवे बसविण्याच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला माजी नगर सेवक नंदू पवार ,वसीम शेख,अजय राऊत ,नरेश डाळिंबे,प्रशांत धनवे,नागेश साळवे,अर्जुन मांडवले,शिवाजी टेकवडे स्थानिक नागरिक, मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी जीवराज बापू पवार यांच्या कार्याची प्रशंसा करत विकासकामांचे स्वागत केले.

नंदू पवारांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की पक्ष कोणताही असो पण जो नागरिकांचे हाकेला ,
अडीअडचणीला धावतो त्याला मतदान करा .

तसेच लवकरच या भागातील राहिलेले प्रश्न मार्गी लावून नागरिकांना सोय उपलब्ध करून देऊ असे मान्यवरानी ग्वाही दिली.

You may also like

Leave a Comment

Search Here