72
पुण्यात अजून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एका ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील वारजे मारवाडी भागात घडली आहे.
२१ मार्चला भर दुपारी साडेबाराच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी दुकानात निघाली होती. यावेळी दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. उत्तम नगर मधील एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच मुलीला ‘तु माझ्याशी विवाह कर नाहीतर तुला मारून टाकेन’ अशी धमकी ही दिली.
या प्रकरणाची माहिती मुलींच्या वडिलांनी वारजे मारवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राहुल गौतम वय 24 ,अविनाश डोंमपल्ले वय 24 दोन्ही राहणार वारजे तसेच पीकॉक लॉज चे मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉज व्यवस्थापक टीकाराम चपाघाई पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.