Home लेटेस्ट न्यूज रामनवमीनिमित्त आयोजित सखी गीत रामायण आणि राम सीता स्वयंवर पुणे येथे कार्यक्रम संपन्न

रामनवमीनिमित्त आयोजित सखी गीत रामायण आणि राम सीता स्वयंवर पुणे येथे कार्यक्रम संपन्न

0 comments

पुणे येथे श्री रामनवमीनिमित्त आयोजित ‘सखी गीतरामायण आणि राम सीता स्वयंवर’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व रामभक्तांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला सखी गीत रामायण कार्यक्रमामध्ये श्रीराम आणि सीता मातेचे स्वयंवर हे बघण्याचा आनंद व्यक्त केला.

ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांनी 7 दशकांपूर्वी गीत रामायणाची सुरुवात केली आणि गीत रामायण अजरामर झाले. यासोबतच ग. दि. माडगूळकर यांना गीत रामायणामुळे आधुनिक वाल्मिकी ही उपमा मिळाली आणि बाबूजी यांनी त्यास त्यातील सर्व प्रसंग जीवंत होतील असे स्वरबद्ध केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गीत रामायणाच्या माध्यमातून जीवनातील सर्व प्रकारचे रस, सर्व संवेदना आपल्याला अनुभवायला मिळत असल्याचे सांगितले.

प्रभू श्रीराम यांनी ईश्वरी शक्तीने नाही तर समाजातील सामान्य लोकांना एकत्र करत, त्यांचे पौरुष जागृत करून रावणाचा निःपात घडवला. यामार्फत आसुरी शक्तीचा निःपात करण्यासाठी शक्तीची नाही सत्याची आवश्यकता असल्याचे प्रभू श्रीराम यांनी सिद्ध केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी, प्रभू श्रीराम यांनी आपल्याला दिलेल्या उच्च जीवन मूल्यांचे भान राहण्यासाठी गीत रामायणाची रचना करण्यात आल्याचे संगितले. यावेळी त्यांनी सखी गीतरामायण सादर करणार्‍या सर्व कलाकारांचे या सुंदर सादरीकरणासाठी अभिनंदन केले व ही अनुभूती दिल्याबद्दल कलाकारांचे व आयोजकांचे आभार मानले.

यावेळी खा. डॉ. मेधा कुलकर्णी, आ. भिमराव तापकीर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Search Here