66
पुण्यात नुकत्याच झालेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जी पणामुळे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील 850 रुग्णालयांना नोटीस पाठविण्यात आली आहे. इमर्जन्सी केसमध्ये संबधित रुग्णांच्या कुटुंबियांकडून कोणत्याही प्रकारे डिपॉझिट घेऊ नये, उपचार चालू केंल्यानंतर इतर गोष्टींबाबत कुटुंबियासोबत चर्चा करा,रुग्णालयात आलेल्या रुग्णांना प्राधान्याने उपचार दिले पाहिजे.जर कोणत्याही रुग्णालयाने डिपॉझिटची मागणी केल्यास त्या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ.सूर्यकांत देवकर यांनी माहिती दिली.