Home लेटेस्ट न्यूज मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

मुक्ताईनगर तालुक्यातील ६१ गावांचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

by sandy
0 comments

एससी ८, एसटी ११, ओबीसी १०, खुल्या प्रवर्गासाठी ३२ राखीव

मुक्ताईनगर प्रतिनिधी : – मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आल्या. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ८ त्यात महिलांसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी ११ त्यात महिलांसाठी ६, ओबीसीकरिता १० त्यात महिलांकरिता ५ तर खुल्या प्रवर्गासाठी ३२ आरक्षण त्यात महिलांसाठी १६ जागा राखीव झाले आहेत.

अनुसूचित जातीमध्ये राजुरे, शेमळदे, हिवरे, इच्छापुर यासह बेलसवाडी, हरताळे, खामखेडे, चिंचोल हे ४ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. अनुसूचित जमातीमध्ये अंतुर्ली, रुईखेडा, भोटा, मेहूण, पिंप्राळा यासोबत चांगदेव, धामणगाव, पारंबी, निमखेडी खुर्द, कुऱ्हा, टाकळी हे ६ गाव महिलांसाठी राखीव आहेत. तर ओबीसी आरक्षणामध्ये दुई, सुकळी, बोरखेडा, कोऱ्हाळा, मानेगाव यांचेसह महालखेडा, काकोडा, तरोडा, चिखली, पातोंडी हे ५ गावे महिलांकरिता आरक्षित झाले आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गामध्ये एकूण ३२ गावे आहेत. त्यात चिंचखेडा खुर्द, हलखेडा, लोहारखेडे, बोदवड, पिंपरीपंचम, धामणदे, निमखेडी बुद्रुक, मेळसांगवे, सातोड, सुळे, जोंधनखेडा, पिंपरी अकाराऊत, वढवे, कर्की, कोथळी ही १६ गावे महिलांसाठी राखीव आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित असलेल्या इतर १६ गावांमध्ये सारोळा, वायला, पुरनाड, उचंदा, घोडसगाव, नायगाव, मोंढळदे, नरवेल, माळेगाव, पिंपरीनांदू, थेरोळा, चिंचखेडे बुद्रुक, वढोदा, नांदवेल, पंचाणे, चारठाणा या गावांचा समावेश आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here