Home लेटेस्ट न्यूज मुक्ताईनगरचा गौरव: समर्थ वंजारीला बाल वैज्ञानिक पुरस्कार व अंतराळ संशोधनाची संधी

मुक्ताईनगरचा गौरव: समर्थ वंजारीला बाल वैज्ञानिक पुरस्कार व अंतराळ संशोधनाची संधी

by sandy
0 comments

मंगेश निळे सरांचे श्री. समर्थ सायन्स क्लासेस,निळे कोचिंग अकॅडमी मुक्ताईनगर चा विद्यार्थी समर्थ शिवाजीराव वंजारी यास होमीभाभा फाउंडेशन मुंबई यांच्याकडून बाल वैज्ञानिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भारतीय अंतराळ संस्था (ISRO) भेट देण्यासाठी समर्थ वंजारी दि.22 ला श्रीहरीकोटा येथे पोहोचलेला आहे .सन 2024- 25 या शैक्षणिक वर्षात होमीभाभा फाउंडेशन मुंबई तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO )यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता पाचवी ते दहावी साठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.सदर परीक्षेला राज्यातून 1 लाख 70 हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले होते. त्यातून निळे कोचिंग अकॅडमी व समर्थ सायन्स क्लासेस, येथील इयत्ता सातवी मधील समर्थ शिवाजीराव वंजारी या विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. जे ई स्कूल चे शिक्षक शिवाजीराव भागवत वंजारी सर यांचा मुलगा असून होमीभाभा फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून बाल वैज्ञानिक पुरस्कार पद्मभूषण प्रा.पी.बी.जोशीसर यांच्याहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रमास शास्त्रज्ञ, होमीभाभा संशोधन केंद्राचे सर्व मान्यवर उपस्थित होते.तसेच समर्थला (ISRO) भेटीत उपग्रह संशोधन, उड्डाण संदर्भात शास्त्रज्ञ भेट,अवकाश संशोधन सर्व माहीती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ISRO भेटीसाठी महाराष्ट्रातून गुणवंत वीस विदयार्थी व सुनिल कुलकर्णीसर समन्वयक होमीभाभा मुंबई व त्यांची सर्व टीम यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्रातून निवड करण्यात आलेल्या वीस विद्यार्थ्यांस सह श्री समर्थ सायन्स क्लासेस मुक्ताईनगरच्या समर्थला संधी मिळाली.या यशाबद्दल माननीय आमदार एकनाथराव खडसे साहेब,मा.केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे तसेच मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी चेअरमन रोहिणीताई खडसे- खेवलकर , तसेच आमदार चंद्रकांत पाटील व श्री समर्थ सायन्स क्लासेस व निळे कोचिंग अकॅडमी चे शिक्षक मंगेश निळे सर व तालुक्यातील सर्व विज्ञान शिक्षक सर्व शिक्षक वृंद यांच्याकडून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा संशोधन वृत्ती जोपासली जावी यासाठी होमी बाबा फाउंडेशन मुंबई तसेच भारतीय अंतराळ संस्था इस्रो यांच्या माध्यमातून कार्य सुरू आहे.समर्थ हा विद्यार्थी मंगेश निळे सरांच्या फॉउंडेशन व स्टेट बोर्ड च्या क्लासमधील इ. 7 वी चे शिक्षण घेत असतांना हे यश मिळवू शकला हे विशेष.

You may also like

Leave a Comment

Search Here