35
दौंड शहरातील गोल राऊंड येथील बस थांबा सध्या अत्यंत दुर्दशाग्रस्त अवस्थेत आहे. स्थानिक विकास निधीतून उभारलेले हे बसस्थानक सध्या कचरा, दारूच्या बाटल्या, आणि दुर्गंधी यामुळे अस्वच्छतेचे केंद्र बनले आहे.
प्रवाशांसाठी उभारलेली प्रतीक्षालये आतून वापरण्यास अयोग्य बनली असून, त्याठिकाणी बसणे तर दूरच पण उभे राहणेही कठीण झाले आहे. विविध ठिकाणी फेकलेला कचरा, दुर्गंधीयुक्त वातावरण, आणि स्वच्छतेच्या अभावामुळे प्रवाशांना भर उन्हाळ्यात तापत्या उन्हात बाहेर उभे राहावे लागत आहे.
स्थानिक प्रशासन आणि स्वच्छता विभागाने या बसस्थानकाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे बसस्थानक म्हणजे दौंडची प्रतिमा दर्शवणारा आरसा आहे, मात्र सध्या ते अयोग्य व्यवस्थापनाचे उदाहरण ठरत आहे.