34
भारतीय जनता पार्टी – महायुती सरकारच्या वतीने समाजसुधारिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे स्मारक नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे उभारले जाणार असून, यासाठी १४२.६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याचबरोबर महिलांच्या सर्वांगीण सशक्तीकरणासाठी महिला प्रशिक्षण केंद्र देखील उभारण्यात येणार असून, त्यासाठी ६७.१७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या स्मारकामुळे ज्ञानज्योती सावित्रीबाईंचे कार्य अधिक व्यापक पातळीवर लोकांपर्यंत पोहोचेल आणि प्रेरणास्थान ठरेल, असे भाजप नेत्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच इतर महायुती नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.