शिवजयंती उत्सव समिती दौंड शहर व तालुका २०२५ यांच्या वतीने दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी शिवजयंतीनिमित्त शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक व मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहर व तालुक्यातील हजारो शिवभक्तांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळी १० वाजता सुरु झालेली मोटार सायकल रॅलीने शहरात भगव्या झेंड्यांचा जल्लोष निर्माण केला.
संध्याकाळी ६ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत ताशा-पथक, लेझीम, झांज पथक, घोडे, उंट, शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक, आगोरी नृत्य, फटाकेबाजी व विद्युत रोषणाई यांसह विविध कलापथकांनी सहभागी होऊन वातावरण भारावून टाकले.
यावेळी निखिल स्वामी (अध्यक्ष, शिवजयंती उत्सव समिती दौंड) व समितीच्या सदस्यांनी मिरवणुकीचे नेटके आयोजन केले होते. सालाबादप्रमाणे यंदाही दौंड पोस्ट ऑफिस पासून मिरवणूक सुरू होऊन पारंपरिक मार्गे पूर्ण झाली.
‘शिवकालीन युद्ध कला, आघोरी नृत्याचे जिवंत देखावे’, हे विशेष आकर्षण ठरले ,जे प्रेक्षकांसाठी लक्षवेधी ठरले.
शिवप्रेमींसाठी महाप्रसादाचेही उत्तम नियोजन मराठा महासंघा मार्फत करण्यात आले होते. यामुळे दौंड शहरात शिवजयंती उत्सव नेत्रदीपक ठरला.