Home लेटेस्ट न्यूज पिरंगुट मशिदीमध्ये बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांना प्रवेशबंदी – ग्रामपंचायतीचा ठराव

पिरंगुट मशिदीमध्ये बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांना प्रवेशबंदी – ग्रामपंचायतीचा ठराव

0 comments

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असताना, पुणे जिल्ह्यातील पिरंगुट गावाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ग्रामपंचायतीने गावातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक मुस्लिम वगळता इतर मुस्लिमांना मशिदीत प्रवेशबंदी केली आहे.

गावातील विशेष ग्रामसभा बोलावून हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार, परप्रांतीय किंवा पंचक्रोशीतील मुस्लीम बांधवांना पिरंगुट येथील मशिदीत नमाज अदा करण्यासाठी येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीच्या मते, हा निर्णय केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि मशिदीतील क्षमतेपेक्षा जास्त गर्दी टाळण्यासाठी घेतला आहे.

गावातील कायदा सुव्यवस्था आणि शांततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत, असा ग्रामपंचायतीचा दावा आहे.

मशिदीबाहेर लावलेल्या अधिकृत फलकावर स्पष्टपणे लिहिले आहे की, “पिरंगुट गावातील मशिदीत आता केवळ स्थानिक मुस्लिम बांधवांनाच प्रवेश दिला जाईल. इतर गावांतील किंवा परप्रांतांतील मुस्लिम बांधवांनी येण्याचे टाळावे.”

You may also like

Leave a Comment

Search Here