महाराष्ट्र राज्यातील शालेय विभागाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातील दुसऱ्या टप्प्यात सन 2024-25 या वर्षासाठी इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा या प्रकारात मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले .या बक्षिसाच्या वाटपाचा कार्यक्रम मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई महाविद्यालय येथे संपन्न झाला मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. या उपक्रमात मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाला 3 लाखाचे बक्षीस मिळाले बक्षीस घेतेवेळी मिठाराम फकीरा तराळ विद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते. हे विद्यालय वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवत असते या बक्षीस वितरण कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत पाटील, माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटूभोई ,धनलाल भोई ,एस.एम. कॉलेजचे प्राचार्य आय.डी.पाटील, गटशिक्षणाधिकारी मदन मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मोरे ,शिक्षण विस्तार अधिकारी सुनील कोंघे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय ठोसर ,सुनील अढगळे तसेच सर्वच शाळेतील केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. अंतुर्ली येथील मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाचे मुख्याध्यापक बावस्कर सर यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली पाहूया याबाबतचा वृत्तांत.
अंतुर्ली येथील मिठाराम फकीरा तराळ विद्यालय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाच्या बक्षीसाने सन्मानित
7