Home लेटेस्ट न्यूज नागपूरमध्ये प्रेमप्रकरणातून अमानुष हत्याकांड: तरुणीचा लोखंडी रॉडने निर्घृण खून

नागपूरमध्ये प्रेमप्रकरणातून अमानुष हत्याकांड: तरुणीचा लोखंडी रॉडने निर्घृण खून

by sandy
0 comments

नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रूरतेच्या कळसाला भिडलेली एक धडकी भरवणारी घटना समोर आली आहे.

पार्किंगमध्ये खुर्चीवर बसलेल्या महिलेवर तिच्याच प्रेयकराने लोखंडी रॉडने १५ वेळा प्रहार करत अवघ्या २० सेकंदांत जीव घेतल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हत्येची शिकार ठरलेली ३० वर्षीय महिला हेमलता वैद्य ही विवाहित असून काही वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर ती आपल्या मुलीसह नागपूरमध्ये राहत होती. आरोपी अक्षय दाते (वय अंदाजे ३० वर्षे) आणि हेमलता यांचं मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होतं. मात्र, अक्षय सतत हेमलताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयातून वारंवार त्यांच्यात वाद होत असे.

मंगळवारी झालेल्या वादानंतर, आरोपी अक्षयनं आधीपासून लपवून ठेवलेला लोखंडी रॉड घेऊन सोसायटीच्या पार्किंगमध्ये आलेल्या हेमलतावर अचानक हल्ला चढवला. खुर्चीवर बसलेल्या हेमलतावर त्यानं अमानुषपणे १५ वेळा रॉडने प्रहार केला. काही क्षणातच हेमलता रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

घटनास्थळाजवळ लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा या संपूर्ण घटनेचा साक्षीदार ठरला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

हेमलता आणि अक्षय हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील रहिवासी आहेत.

या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here