प्रतीनीधी-जळगाव मधील महाबळ येथील रहिवासी कपिल भिकनराव गुरव यांचा सीमा सडक संघटन (बी आर ओ) मध्ये गेल्यावर्षी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशेष पुरस्काराने भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजेजू , सेना अध्यक्ष भूपेंद्र दिवेदी यांच्या उपस्थितीमध्ये महानिर्देशक सीमा सडक संघटन लेफ्ट जनरल रघु श्रीनिवासन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
जळगाव मधील महाबळ कॉलनी येथे रहिवासी असलेले कपिल भिकनराव गुरव हे गेल्या 14 वर्षापासून भारतीय सीमा सडक संघटन म्हणजेच बी आर ओ येथे सेवा बजावत आहेत, ही सेवा बजावत असताना देखील देशासाठी विशेष सेवा बजावली म्हणून केंद्र सरकारच्या वतीने काल दिल्ली येथे एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला , या प्रसंगी पूर्ण भारतातून 62 लोकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये जळगावच्या कपिल भिकनराव गुरव यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.
कपिल गुरव यांनी आत्तापर्यंत अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम, लदाख, दिल्ली, येथे कनिष्ठ अभियंता म्हणून सेवा बजावली आहे व बजावत आहेत.