Home लेटेस्ट न्यूज भिका जावरे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

भिका जावरे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

by sandy
0 comments

जि प मराठी प्राथमिक शाळा घोडसगाव ता मुक्ताईनगर येथील शिक्षक श्री भिका प्रल्हाद जावरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्य शिक्षक पुरस्कार देऊन व सिंगापूर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्यावर पाठवून त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. ही समाजासाठी खूपच अभिमानाची बाब असून त्यानिमित्ताने श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र यांनी भिका जावरे यांना अग्रेसर भवन शेगाव येथे आयोजित केलेल्या तेली समाजाच्या प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनात कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णाजी खोपडे आमदार पूर्व नागपूर यांच्या हस्ते शाल श्रीफळ संताजी महाराजांची मूर्ती सन्मान चिन्ह व समाज भूषण पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.

यावेळी नेपाळ येथील साहू तेली समाजाचे अध्यक्ष सत्यनारायणजी साहा,दिल्ली येथील समाजसेवक रणजीतजी गुप्ता,नागपूरचे माजी खासदार सुरेशजी वाघमारे,प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष विजयजी चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष उमेश साहू, श्री संताजी मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष सुभाषजी घाटे, कार्यकारी अध्यक्ष मंगेशजी सातपुते,संघटन सचिव मुकुंद खेडकर, प्रमोद वरुडकर यांच्यासह तेली समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Search Here