39
दौंड (१२ मे २०२५): श्री मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दौंड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बारामती जिल्हा यांच्या प्रारंभिक प्रशिक्षण वर्गात भगवान गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वर्गात सहभागी सर्व शिक्षार्थ्यांनी सामूहिकरित्या बुद्ध वंदना गायली आणि भगवान बुद्धांच्या शिकवणीचे स्मरण करून श्रद्धा अर्पण केली.
कार्यक्रमास वर्ग कार्यवाह सतीश देशपांडे, दौंड तालुका कार्यवाह भालचंद्र खळदे, जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण कुटे, प्रशांत खादगे तसेच जिल्हा प्रचारक दीपक बधे हे मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संयम, शांती व मूल्यनिष्ठ जीवनशैलीचा संदेश पोहोचवण्यात आला.