Home लेटेस्ट न्यूज भुसावळात भव्य तिरंगा रॅली; देशभक्तीच्या वातावरणात तीन मंत्र्यांचा सहभाग

भुसावळात भव्य तिरंगा रॅली; देशभक्तीच्या वातावरणात तीन मंत्र्यांचा सहभाग

by sandy
0 comments

भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ भव्य मोटरसायकल रॅली
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण होते. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. त्यामुळं भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ भुसावळ शहरातील सर्व भारतीयांतर्फे रविवारी दुपारी चार वाजता बियाणी मिलीटरी स्कूल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड पर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांसह राजकीय लोकप्रतिनिधी या रॅलीत दुचाकीवरून सहभागी झाले.

रॅलीत तीन मंत्र्यांचा सहभाग

या रॅलीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा प्रमुख सहभाग होता या शिवाय भाजपाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच तालुक्यातील पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक तसेच महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

शहरात देशभक्तीपर वातावरण

तिरंगा रॅलीच्या अग्रभागी जीपवर भारत मातेची प्रतिमा ठेवण्यात आली तसेच रॅलीत देशभक्तीपर गाण्यांची धूम वाजवण्यात आली शिवाय रॅलीत सहभागी सर्वांनीच हातात तिरंगा ध्वज हाती घेतल्याने शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय, जय हिंद’ अशा घोषणा करण्यात आली.

You may also like

Leave a Comment

Search Here