दर महिन्याला 30 ते 40 हजार रुपये लाच घेण्याचा आरोप हुक्का पार्लर व बारला देत होता संरक्षण पोलीस आयुक्तांनी शिकवला चांगलाच धडा पुण्यातील काळेपडळ हद्दीतील घटना.
पुणे शहरांमधील वारंवार कठोर भूमिका घेतल्यास जाऊन ते बंद करण्याचे प्रयत्न करणाऱ्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील अवैध धंद्यांना पाठबळ पुरविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना व पोलीस कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकवला आहे. यापुढे अशा अवधंगांना पाठबळ देऊन त्यांच्याकडून लाच वसूल करत असाल तर तुमची खैर नाही असे त्यांना दमदाटी दिली अवैध धंद्यांना पाठबळ देऊन त्यांच्याकडून हफ्ता घेणाऱ्या काळेपडळ पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस अधिकारी उपनिरीक्षक यांना पोलीस उपयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे. याच प्रकरणाची दुसरी कारवाई करून आता तरी सुधरा असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. यापुढे अवैध धंद्यांना संरक्षण दिले तर तुमची खैर नाही असे पोलीस उपयुक्त आणि सांगितले आहे.
या प्रकरणांमध्ये शरद निवृत्ती नवले हे निलंबित झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तसेच मोहम्मद वाडी येथील बीबीसी रोपटॉप किचन अँड बार येथील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा व काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली या ठिकाणी 16 टेबलांवर 57 तरुण तरुणी हुक्का पिक असल्याचे आढळून आल्यावर या पार्लरवरील पुण्यातील ही सर्वात मोठी कारवाई होती.
एप्रिल 2025 पासून या हॉटेलमध्ये हुक्का विकण्यास सुरुवात झालेली होती त्याबाबत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शरद नवले यांच्याशी बोलणे झाले होते त्यांनी हुक्का बार सुरू करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केले सुरुवातीलाच गुडलकचे 30000 व एप्रिल महिन्याचे 30000 असे एकूण 60 हजार रुपये त्यांनी दहा एप्रिल 2025 रोजी आमच्याकडून स्वीकारली असे या हॉटेलचे मालक पार्थ अनिल वाल्हेकर यांनी त्यांच्या चौकशीमध्ये सांगितले.
त्यानंतर त्यांच्या ओळखीचे हनुमंत गायकवाड पाटील यांनी हॉटेल मालक यांना 12 मे रोजी फोन करून नवले यांनी 30 हजार रुपये घेण्यासाठी सांगितले आहे त्यांच्यामार्फत ऑनलाईन तीस हजार रुपये आम्ही दिले. शरद नवले यांनी हॉटेल मालकाला बेकायदेशीरपणे हुक्का विक्री करण्यास प्रोत्साहन देऊन त्या बदल्यात त्यांच्याकडून नव्वद हजार रुपये स्वीकारल्याचे प्रथमदर्श दिसून आले त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मुलीं केल्याने शरद नवले याला पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे.
पोलीस आयुक्तांनी हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना देखील मेसेज पार्लर चालवणाऱ्या हॉटेल मालकाला पाठवून सावध केल्याबद्दल यापूर्वी एका निलंबित पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदारांनी निलंबित करण्यात आले होते या प्रकरणात या प्रकारची दुसरी कारवाई झालेली असून अशा धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आता तरी सुधरा असा इशारा पोलीस आयुक्त आम्ही अमितेश कुमार यांनी दिला आहे.