10
मुंबई-अमरावती ‘अंबा एक्सप्रेस’ची ओव्हरहेड वायर तुटली. मुर्तीजापुर जवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबई आणि हावडाकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत. अमरावती एक्सप्रेससह, विदर्भ एक्सप्रेस, अमरावती पुणे एक्सप्रेस, नागपुर पुणे एक्सप्रेस थांबवल्यात. ओव्हरहेड वायर जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू. ओव्हरहेड वायरचा बिघाड दूर करण्यात लागणार किमान दोन तासांचा अवधी. मुंबई आणि हावडाकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत. रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार. अनेक गाड्या नागपूर ते मुंबईदरम्यान थांबवण्यात आल्यात. तांत्रिक बिघाडामुळे मुंबई आणि हावडाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल.