तेल्हारा बस स्थानकाची दयनीय अवस्था
नागरिकांचे एसटी बसने प्रवास करणे झाले जिकरीचे
तेल्हारा प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील बस स्थानक हे शोभेची भावली बनली आहे असून अडचण नसून खुळांबा झाले आहे, या बस स्थानकावर ती ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे घाणीचे साम्राज्य झालेले आहेत तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, गेल्या अनेक वर्षापासून वापरात असलेल्या एसटी बसेस वापरल्या जात आहेत सध्या पावसाळा तोंडावर असताना देखील या बसेसची देखभाल केली जात नाही दुरुस्ती केली जात नाही अशातच अवकाळी पावसाने एसटी बसची दाणादाण उडाली आहे प्रवाशांना एसटीतून प्रवास करताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे चित्र देखील यावेळी पहावयास मिळाले आहे आता तरी प्रशासन नवीन बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देईल का हा एक प्रश्न पडला आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून तेल्हारा जिल्हा अकोला येथील एसटी महामंडळाची अत्यंत दणनीय अवस्था आपल्याला बघायला मिळत आहे.
एस टी महामंडळाचे अधिकारी बस स्टँड कडे तर दुर्लक्ष करतच आहेत पण आता एक भयंकर प्रकार घडताना आपल्याला दिसत आहे.
चक्क चालू बस मध्ये पावसाच्या धारा लागलेल्या आपल्या सर्वांना दिसून येत आहेत.
अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा तालुका हा या समस्या मध्ये भरपूर ग्रासलेला असून रस्त्यांच्या समस्येबाबत कित्येक वर्ष त्यांना वाट पाहावी लागत आहे.
आता ते झाल्यानंतर एसटी महामंडळाला जागे होऊन एसटी बसेसची सुधारणा करण्यासाठी नागरिकांची तक्रार आहे.
इतक्या जुन्या प्रकारच्या बसेस झाल्या आहेत की नागरिकांचे प्रवास करणे सुद्धा धोक्याचे झालेले आहेत.