Home राजकीय शिवनेत्र मल्टीपर्पज निधी लिमिटेडचा 4 था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

शिवनेत्र मल्टीपर्पज निधी लिमिटेडचा 4 था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

by sandy
0 comments

शिवनेत्र मल्टीपर्पज निधी लिमिटेड व शिवनेत्र महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,दौंड यांच्या वतीने संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच या सोहळ्याचे विशेष म्हणजे या संस्थेने 13 कोटी 33 लाख ठेवीची पूर्तता केली आहे , हा कार्यक्रम रविवार, दिनांक 25 मे 2025 रोजी हॉटेल प्राईम स्क्वेअर दौंड पुणे येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र केडे पोलिस प्रशासक नानविज दौंड आणि सोमनाथ वाघचौरे समादेशक राज्य राखीव पोलिस दौंड .

तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील सरोदे डी वाय एस पी राज्य राखीव दल दौंड.

सन्मानीय मान्यवर मध्ये निर्मला सावंत एम डी फॉर्च्यून कं ., जिवराज पवार माजी नगरसेव क आणि नवनाथ दरेकर एन एम डी पुणे या सर्वंच विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विशेष मार्गदर्शन म्हणून अनेक मान्यवरांचा पण सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात भव्य लकी ड्रॉ सोडत घेण्यात आली, ज्यामध्ये विजेत्यांना खालीलप्रमाणे रोख बक्षिसे देण्यात आली:
प्रथम बक्षीस: सुनीता वाजे – ₹51,000,द्वितीय बक्षीस: गटने सर – ₹21,000,तृतीय बक्षीस: वर्षा झुरुंगे – ₹11,000,चतुर्थ बक्षीस: करण जात – ₹7,000

याशिवाय, 124 सदस्यांच्या भिशी लकी ड्रॉमध्ये आईशा शेख यांना ₹30,000 चे रोख बक्षीस मिळाले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन रवी पवार आणि दिनेश पवार यांनी केले तसेच संयोजन संस्थापक चेअरमन सुप्रिया सचिन काकडे व सचिन काकडे यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, सभासद, व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Search Here