Home लेटेस्ट न्यूज चेंबूरमध्ये धक्कादायक घटना – पत्नीने शरीरसंबंधास नकार दिल्यामुळे पतीने रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न; ७० टक्के भाजली

चेंबूरमध्ये धक्कादायक घटना – पत्नीने शरीरसंबंधास नकार दिल्यामुळे पतीने रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न; ७० टक्के भाजली

by sandy
0 comments

मुंबई मधील चेंबूरमधील वाशी नाका परिसरात ३० मे २०२५ रोजी एक संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना घडली.

पत्नीने शरीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्यावर रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही घटना सकाळच्या सुमारास, पीडित महिला कामावर जाण्याच्या तयारीत असताना घडली. या अमानुष हल्ल्यात ३८ वर्षीय महिला ७० टक्क्यांहून अधिक भाजली असून, तिच्यावर सायन रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे स्पष्ट केले आहे.

चेंबूर नाका पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संतापाची लाट उसळलेली असताना, अशा आणखी एका घरगुती हिंसाचाराच्या घटनेने नागरिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या क्रूर कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवून पुढील कारवाई सुरू केली असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here