Home लेटेस्ट न्यूज पुण्यात धक्कादायक प्रकार : विवाहित महिलेवर लग्नासाठी दबाव टाकून लैंगिक अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात धक्कादायक प्रकार : विवाहित महिलेवर लग्नासाठी दबाव टाकून लैंगिक अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

by sandy
0 comments

पुणे : शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असताना, बिबवेवाडी परिसरात एका विवाहित महिलेवर लग्नासाठी दबाव टाकून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नानासाहेब (पूर्ण नाव तपासात) वय अंदाजे ४० वर्ष, गेल्या दोन महिन्यांपासून पीडित महिलेचा मानसिक छळ करत होता. तो सतत तिला लग्नासाठी धमकावत होता. एके दिवशी त्याने “तू जर माझ्याशी लग्न केलं नाहीस, तर तुझ्या कामाच्या ठिकाणी येऊन फिनेल पिऊन आत्महत्या करेन” अशी धमकी दिली.

या धमकीने घाबरून पीडिता आरोपीसोबत गाडीत बसली आणि ते लॉजवर गेले. तिथे आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. अत्याचारादरम्यान त्याने पीडितेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. पुढे त्याच माध्यमातून धमकी देत म्हणू लागला, “माझ्याशी लग्न कर, नाहीतर हे फोटो तुझ्या वडिलांना पाठवीन.”

या प्रकाराने त्रस्त झालेल्या महिलेने अखेर धैर्य एकवटून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी नानासाहेबविरुद्ध भारतीय दंड विधानातील विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रवृत्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here