Home लेटेस्ट न्यूज दौंड शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नागरिक त्रस्त, मनसेने घाण पाण्यात बसून आंदोलन छेडले

दौंड शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नागरिक त्रस्त, मनसेने घाण पाण्यात बसून आंदोलन छेडले

by sandy
0 comments

दौंड शहरातील गोपाळवाडी रोड,सावंत नगर,महालक्ष्मी हॉस्पिटलजवळ, समता नगर रोड आणि गावातील भाजी मंडई परिसरात ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि तुंबलेल्या गटारांमुळे प्रचंड घाण निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील स्वच्छतेकडे दौंड नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

गावातील भाजी मंडई, हिंदू स्मशानभूमी, दशक्रिया विधी घाट, चैतन्य मारुती मंदिर आणि महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गटारींच्या चेंबरमधून घाण पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. या घाण पाण्यातून अंत्ययात्रा नेण्याची वेळ नागरिकांवर येत असून, त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. वेळोवेळी नगरपालिकेला पत्रव्यवहार करून सुधा यावर कायमस्वरूपी पर्याय न काढल्यामुळे या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हा पदाधिकारी सचिन कुलथे यांनी या घाण पाण्यातच बसून आपले तीव्र आंदोलन सुरू केले आहे.

नगरपालिका करत नाही कायमस्वरूपी उपाय:
मध्यंतरी तात्पुरती साफसफाई करण्यात आली होती, परंतु चेंबर पुन्हा तुंबले असून, पूर्ववत स्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यालगत असलेल्या कमालवाडी वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना दररोज या घाण पाण्यातून वाट काढून घरात जावे लागत आहे. त्यामुळे परिसरात आरोग्यधोक्याचे संकट निर्माण झाले आहे.

शहरातील धार्मिक स्थळांचा अवमान:
हिंदू स्मशानभूमी व मंदिर परिसरात साचलेली घाण, तुंबलेली गटारे आणि दुर्गंधीमुळे पावित्र्याला बाधा पोहचत आहे. त्यामुळे दौंडमधील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी नगरपालिकेकडून त्वरित, ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.

You may also like

Leave a Comment

Search Here