दौंड शहरातील एका नामांकित हरिओम फोटो स्टुडिओ दुकाना मधील फोटोग्राफरला मारहाण , शिवीगाळ दमदाटी झाल्याच्या प्रकारावरून दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशन आक्रमक झाली आहे. यासंदर्भात आज, दिनांक 13 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजता दौंड पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत अनिल घोडके या फोटोग्राफरवर 11 जून 2025 रोजी अनोळखी इसमांनी फोटो लवकर का देत नाही या कारणावरून शिवीगाळ ,दमदाटी आणि हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे सर्वच फोटोग्राफर वर्गात असंतोषाची भावना आहे. त्यामुळे दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशन आणि दौंड शहर फोटोग्राफर असोसिएशन,काष्टी,कर्जत आणि भिगवन फोटोग्राफर असोसिएशन ने एकत्रितपणे पोलीस प्रशासनाकडे निवेदन देत संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी असोसिएशनचे रोहित पाटील , योगेश गायकवाड, सुनील मूलचंदानी,गणेश गुत्तेदार, सचिव कैलास पंडित उपस्थित होते. या घटनेचा निषेध करत पुढील काळात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या मारहाणीची घटना सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेतील आरोपीं विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे तपास अधिकारी पोलीस हवालदार राहुल घाडगे यांनी सांगितले.