दौंड शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष ओंकार कड्डे यांची भारतीय जनता पार्टी सोशल मीडियाच्या पुणे दक्षिण जिल्हा प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘विकसित भारत अमृत काळातील सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या विशेष उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डिजिटल पातळीवर प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा प्रचार डिजिटल माध्यमांद्वारे अधिक प्रभावीपणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि कल्याणकारी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत जनजागृती निर्माण करणे या हेतूने ओंकार कड्डे यांची ही निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक असून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुणे शहर व जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
याशिवाय, ते भाजप भटके विमुक्त आघाडीचे माजी पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडली असून, सध्या ते भाजप युवा मोर्चा दौंड शहर अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात त्यांनी तब्बल १००० नवीन सदस्यांची नोंदणी करून तालुक्यातील युवकांचे संघटन मजबूत केले आहे.
या नव्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया देताना ओंकार कड्डे यांनी सांगितले की, “दौंड तालुक्याचे आमदार मा. राहुलदादा कुल आणि मा. जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या नवीन भूमिकेत पूर्ण निष्ठा व कार्यक्षमतेने काम करणार आहे. भाजपा सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे कार्य सामान्यांपर्यंत पोहोचवणे हे माझे प्रमुख ध्येय राहील.”
ओंकार कड्डे यांची भाजप सोशल मीडियाच्या पुणे दक्षिण जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती; ‘विकसित भारत अमृत काळ’ उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी
11