पुण्यातून एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय विवाहितेवर तिच्या नणंदेसह एका ख्रिश्चन धर्मगुरूकडून धर्मांतरासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेनं ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आला. या त्रासाला कंटाळून अखेर तिनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने मारहाण तक्रारीनुसार, पीडित महिला आपल्या पतीसह सासरी राहत होती. तिच्या नणंदेने वारंवार ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा आग्रह केला. सुरुवातीला पीडित महिला हे दुर्लक्ष करत होती. मात्र, नंतर नणंदेने तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली.
एका दिवशी पीडित महिलेनं स्पष्टपणे धर्मांतरास नकार दिला असता तिच्यावर शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे महिला मानसिकदृष्ट्या हादरली होती. त्यातच ‘फ्रान्सिस’ नावाच्या एका धर्मगुरूने पीडितेला धमकावत म्हणाले की, “मी बाटलीतून आणलेले पवित्र पाणी तू प्यायले नाहीस, धर्म स्वीकारला नाहीस तर तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली जाईल.”
पोलिसांकडे तक्रार दाखल, चौकशी सुरु,
या प्रकरणी संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडितेच्या नणंदेसह धर्मगुरूवर धार्मिक जबरदस्ती, धमकी, मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धर्माच्या नावावर दबाव हा कायद्याने गुन्हा आहे ,
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्तीने धर्म बदलण्यासाठी दबाव टाकणे हा कायद्याने गुन्हा आहे.
सामाजिक प्रश्नांवर पुन्हा लक्ष केंद्रित,ही घटना उघड झाल्यानंतर नागरिकांत खळबळ माजली असून धर्माच्या नावावर होणाऱ्या जबरदस्तीविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी वाढू लागली आहे. संबंधित यंत्रणांनी तत्काळ हस्तक्षेप करून पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.
पुण्यात विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव; नकार दिल्याने मारहाण, धमकी दिल्याचा आरोप
18