दौंड मधील संस्कार प्रायमरी आणि हायस्कूलचे अध्यक्ष तसेच दौंड तालुका इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन चे खजिनदार मा.जयंत पवार सर यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत सलग काही वर्षांप्रमाणे यावर्षीही दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन केले.
या उपक्रमांतर्गत स्व. सुभाष अण्णा कुल मतिमंद मुलांची शाळा, पासलकर वस्ती, दौंड येथील विशेष मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून योगेश चुंबळकर, अर्जुन मंडवाले, रणजित बहिरट, डॉ. रोहन खवटे,नीता ताई वाघमारे (पो. पाटील, लिंगाळी), किरण खडके,अफताब सय्यद,रूपेश बंड, अमोल जगताप, पवन मोरे, ओमकार जाधव, प्रदीप मदने, निखिल स्वामी, गणेश जगदाळे, दीपक वाघमारे यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार उपस्थित होता.
विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी अमोल जगताप यांनी उपस्थितांना विशेष विद्यार्थ्यांविषयी माहिती देताना सांगितले की, “या मुलांना सांभाळणे हे खूपच जबाबदारीचं आणि कठीण काम असलं, तरी शाळेतील शिक्षक हे कार्य आनंदाने आणि समर्पित भावनेने करत आहेत.” त्यांनी सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रोहन खवटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
शाळेतील पालक, शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनीही या उपक्रमात सहभाग घेत जयंत पवार सरांना आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
