Home लेटेस्ट न्यूज पुण्यात पोलिसांवर हल्ला; वेगात दुचाकी चालवण्यावरून वाद, चौघांना अटक”

पुण्यात पोलिसांवर हल्ला; वेगात दुचाकी चालवण्यावरून वाद, चौघांना अटक”

by Arjun Mandwale
0 comments

पुणे शहरातून पोलिसांवरील हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “गाडी वेगात का चालवतो?” हा साधा प्रश्न विचारल्याने टोळक्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. हा प्रकार पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी परिसरात काल (31 जुलै) रात्री घडला.

रात्री नऊच्या सुमारास, पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी खडकी परिसरात गस्त घालत होते. याच दरम्यान, एक दुचाकीस्वार अत्यंत वेगात आणि बेधुंदपणे गाडी चालवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी दुचाकी थांबवून विचारणा केली असता, दुचाकीवरील युवकांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

थोड्याच वेळात, दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या त्यांच्या मित्रांनीही पोलिसांशी झटापट सुरू केली. क्षणात वाद उफाळून चौघांनी मिळून पोलिसांवर हल्ला केला आणि घटनास्थळावरून फरार झाले.

या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तात्काळ कारवाई करत चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जुनेद इक्बाल शेख (वय 27),नफीज नौशाद शेख (वय 25),युनूस युसुफ शेख (वय 25),आरिफ अक्रम शेख (वय 25) असे आहे.


या हल्ल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, खडकी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपींविरोधात शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला, कायदा-सुव्यवस्था भंग, आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


पुणे शहरातील पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना अशा प्रकारचे हल्ले होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांवरच हल्ला होणे हे लोकशाही व्यवस्थेसाठी चिंतेचे लक्षण मानले जात आहे. पोलिस प्रशासनाने तत्काळ हालचाल करून आरोपींना अटक केली आहे, मात्र अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना गरजेच्या आहेत.

You may also like

Leave a Comment

Search Here